मंत्री आबीटकरांच्या हस्ते कुर गावात ‘कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू’ या राज्यस्तरीय शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ

कोल्हापूर : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, कोल्हापूर अंतर्गत स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत पंचायत समिती, भुदरगड यांचे वतीने कुर गावात ‘कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू’ या राज्यस्तरीय शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आजच्या काळात प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आपण पाहत आहोत. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या उत्कर्षासाठी संकल्प करताना, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता या महत्त्वाच्या विषयांना प्राथमिकता द्यावी.
हे अभियान अधिक चांगल्या व प्रभावी पद्धतीने यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करूया. आपल्या गावात, घरात, परड्यात, व्यवसायाच्या ठिकाणी याचा वापर करावा. यामध्ये स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण होतील. राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेऊन अशा प्रकारच्या प्रत्येक अभियानातून पुढे जाता येईल. स्वच्छतेसंबंधी प्रशिक्षण आयोजित करून जिथे चांगले काम झाले आहे, तिथे सहभागींना भेटी देण्यासाठी नेले जाऊ शकते.’
यावेळी पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परिट, गोकुळचे संचालक नंदकुमार डेंगे, कल्याणराव निकम, माजी उपसभापती अजितदादा देसाई, मा.जि.प.सदस्य जीवन पाटील, गटविकास अधिकारी शेखर जाधव, सरपंच मदनदादा पाटील, उपसरपंच संदीप हळदकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

🤙 9921334545