शेंडूरे कॉलेज हुपरी माजी विद्यार्थी असोसिएशन यांच्यावतीने माजी विद्यार्थी मेळावा

कुंभोजहुपरी (ता. हातकणंगले ) येथील रयत शिक्षण संस्थेचे चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे कॉलेज हुपरी माजी विद्यार्थी असोसिएशन यांच्यावतीने माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता या माजी विद्यार्थी मेळाव्यास हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव मानेयांनी भेट दिली तसेच सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी उपजिल्हा अधिकारी सांगली  सविता लष्करे, प्राचार्य पाडळकर, राहुल इंगोळे, अजित पाटील, शिवराज नाईक वीरकुमार शेंडूरे, धैर्यशील चौगुले, प्रदीप सुतार, यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

🤙 9921334545