धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या?

मुंबई:निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले होते. ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आले होते, असं रंजित कासले यांनी म्हटलं होतं. त्यांनी यावेळी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील दाखवलं. त्यातील साडेसात लाख रुपये आपण वापस केले, तर उरलेल्या अडीच लाख रुपयांमधून माझा खर्च सुरू आहे, असं कासले यांनी म्हटलं होतं. कासले यांच्या आरोपांनंतर आता माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कासलेंच्या आरोपांचा दाखला देत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख हे आता न्यायालयात धाव घेणार आहेत. ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये दिल्याचा आरोप रणजित कासले यांनी केला होता. कासलेंच्या आरोपांचा दाखला देत राजेसाहेब देशमुख कोर्टात जाणार आहेत, ते मुंडेंच्या आमदारकीविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. एकट्या रंजित कासले यांना जर दहा लाख रुपये दिले असतील तर बाकिच्यांना किती दिले? अस सावाल राजेसाहेब देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

रंजित कासले यांनी सांगितलं की ईव्हीएम छेडछाडच्या मोबदल्यात मला दहा लाख रुपये दिले. एका कासलेला दहा लाख रुपये दिले, मग इतर पोलीस अधिकाऱ्यांना किती दिले, धनंजय मुंडे कोण आहेत? आणि त्यांचं काय कार्य आहे? आणि लोकशाहीत किती सक्षमपणे काम चाललं आहे, हे तुम्ही सर्वांनी आता पाहिलं, म्हणून मी आता या प्रकरणात दाद मागण्यासाठी हाय कोर्टात जाणार आहे, असं राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलं आहे.