आ. विनय कोरेंच्या पाठपुराव्याने शाहूवाडीतील एकावर मोफत शस्त्रक्रिया

कोल्हापूर : चरण (ता.शाहूवाडी) येथील कु.अजिंक्य अजित पाटील (वय १३ वर्ष) यांच्या मनक्यावर मुंबईतील कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ९ लाख रूपये खर्च आला.आमदार विनय कोरे यांच्या मदतीने हि शत्रक्रिया मोफत झाली. मुंबई येथे ही शस्त्रक्रिया मोफत करून दिल्याबद्दल पाटील कुटुंबियांनी त्यांचे कृतज्ञपूर्व आभार व्यक्त केले.

यावेळी अजिंक्यचे वडील अजित आनंदा पाटील,रामचंद्र वेल्हाळ(आबा),राजाराम दत्तू पाटील,प्रदिप दत्तात्रय पाटील,संजय बंगे आदी मान्यवर उपस्थित होते…