कोल्हापूर : प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न, सुरक्षितता आणि आत्मसन्मानाचे प्रतीक म्हणजे त्याचे घर बोंद्रेनगर, फुलेवाडी येथील कै. महिपतराव बोंद्रे हाऊसिंग सोसायटीच्या 77 कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले असून झोपडपट्टीतील कुटुंबांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सुरक्षित निवारा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न पुर्णत्वास गेले.
वास्तुशांतीच्या मंगलमय सोहळ्याने या नव्या घरांमध्ये नव्या आशा, नवी स्वप्ने आणि नव्या भविष्याची पहाट उजाडली आहे! या आनंदाच्या क्षणी घरकुल लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच माझ्या प्रयत्नांचा खरा विजय आहे.असे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
गृहनिर्माण मंत्री असताना हा प्रकल्प आमदार सतेज पाटील यांनी मंजूर केला होता. पुणे येथील शेल्टर असोसिएट, प्रधानमंत्री आवास योजना, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून बोंद्रेनगर येथील 77 घरांसह कोल्हापुरात 104 घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेला हा प्रकल्प 36 हजार स्क्वेअर फुट इतका असून यामध्ये प्रत्येक घरकुल 250 स्क्वेअर फुट आहे. प्रत्येक घरकुलाला हॉल, किचन 2 बेडरूम आणि टॉयलेट, बाथरूम, युटिलिटी स्पेस यासह रहिवाशांना काँक्रीट रोड, भूमिगत लाईट, स्वच्छ पाणी, कम्युनिटी हॉल अशा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
गुढीपाडव्या दिवशी झालेल्या मंगलमय वास्तुशांती सोहळ्याला माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह उपस्थित राहिलो. आर्कि. शिरीष बेरी, शेल्टर असोसिएट्सच्या प्रतिमा जोशी, सरोज इंडस्ट्रीजचे दिपकराव जाधव, माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, राहुल माने, वनिता देठे, रीना कांबळे, दुर्वास कदम, सुयोग मुगदुम यांचीही उपस्थिती लाभली. कै. श्रीपतराव बोंद्रे गृहनिर्माण प्रकल्पाचे अध्यक्ष अशोक देगावे, सचिव भिकाजी वायदंडे, सोसायटीचे इतर पदाधिकारी, बांधकाम कॉंट्रॅक्टर राजेंद्र दिवसे, ऋतुजा भराटे व शेल्टरची सर्व टिम आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि पुणे येथील शेल्टर असोशिएट्सच्या संचालिका प्रतिमा जोशी आणि त्यांच्या टिमचे विशेष सहकार्य लाभले. एटीई चंद्रा फाऊंडेशन यांच्याकडून मनुष्यबळाचा खर्च, याशिवाय शिरीष बेरी यांच्याकडून कम्युनिटी हॉल, डीएमआय फायनान्स यांच्याकडून रिटेनिंग वॉल, कोर्टयार्ड बांधण्यासाठी सहकार्य मिळाले. तसेच सरोज इंडस्ट्रीजचे भरत जाधव आणि दिपक जाधव बांधकाम परवानगी, संपुर्ण प्रकल्पाचे स्ट्रक्चर ड्रॉविंगसाठी इंजिनियर घारपुरे यांनी मदत केली. याशिवाय माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, राहुल माने, शारंगधर देशमुख, समाज कल्याण ऑफिस, करवीर तहसिलदार कार्यालय, महावितरण, बँक ऑफ महाराष्ट्र, कै. महिपतराव बोंद्रे हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अशोक देगावे, सचिव भिकाजी वायदंडे, राजेंद्र दिवसे यांनीही प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी सहकार्य केले.