मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत क्षयमुक्त ग्रामपंचायत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ

कोल्हापूर : कागल येथील बहुउद्देशीय हॉल येथे “क्षयमुक्त भारत अभियान” अंतर्गत 2024 चे क्षयमुक्त ग्रामपंचायत यांचा तालुकास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.कागल तालुक्यामध्ये चौफेर प्रगती झाली आहे. सर्व क्षेत्रात तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे. चांगल्या अधिकाऱ्यांच्यामुळे हे शक्य झाले असल्याचे स्पष्ट करून कॅन्सरमुक्त आणि क्षयमुक्त केल्याशिवाय आपण राहणार नाही. क्षय मुक्तीसाठी काम केलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्याचे यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कौतुक केले.

 

 

 

यावेळी गोपीनाथ मुंडे अपघात योजनेच्या लाभार्थ्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये अनुदानाचे वाटप मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. कागल येथील डॉ. नवनाथ मगदूम व डॉ. श्वेता मगदूम यांनी 2024 मध्ये 31 क्षयरुग्णांची नोंदणी करून सहकार्य केल्याबद्दल माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच; पेठवडगाव येथील रहो बोथ सेवा संस्था यांनी 5 रुग्णाची सहा महिन्याकरता दत्तक घेऊन फूड बास्केट पुरविले व क्षयमित्र म्हणून बांधिलकी जपल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव ठाकूर आदी प्रमुख उपस्थित होते.
रहो बोथ सेवा संस्था- पेठवडगाव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक तसेच; सौ. सरिता रघुनाथ पाटील- गटप्रवर्तक यांना सर्वोत्कृष्ट घर परोचक जिल्हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
स्वागत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी केले. मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान डवरी, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौ. सरिता थोरात, कृषी अधिकारी श्री. थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते.
आभार कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. थोरात यांनी मानले.

 

🤙 9921334545