कोल्हापूर : करवीर मतदारसंघातील प्रतीक पाटील (रा. परिते) आणि अप्पा अकाराम भुतल (रा. भुतलवाडी) या दोन शेतकऱ्यांवर गव्यांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली होती. आज आमदार चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर येथील सिपीआर रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.
दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील संबंधित डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर समजले. यावेळी त्यांच्या त्यांच्याशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून धीर दिला. तसेच डॉक्टरांना योग्य तो उपचार करावा अशी सूचना त्यांनी केली.