आ. अमल महाडिक यांच्याकडून अंबाई जलतरण तलावाची पाहणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचा अंबाई जलतरण तलाव गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. देखभाल दुरुस्ती अभावी जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक आणि जलतरणपटूंना पोहण्यासाठी अन्यत्र जावे लागते. या जलतरण तलावाची डागडुजी करण्याची मागणी जलतरणपटू आणि नागरिकांमधून होत होती.

 

 

त्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत अंबाई जलतरण तलावाची आमदार अमल महाडिक यांनी पाहणी केली. तलावाच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करावा शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली.

🤙 9921334545