मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 2024 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
₹25 लाख रोख रक्कम, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम सुतार हे 100 वर्षांच्या वयातही शिल्पकलेसाठी सतत कार्यरत आहेत. सध्या इंदू मिल येथे निर्माणाधीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील शिल्प तयार करण्याचे कार्यही ते करीत आहेत. त्यांचे अद्वितीय योगदान लक्षात घेऊन 12 मार्च 2025 रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.