राजू शेट्टी यांची वडगाव कोर्टातून निर्दोष मुक्तता

कोल्हापूर : वारणा कारखाना परिसरात उस आंदोलनादरम्यान झालेल्या गुन्ह्यातून आज (बुधवार, १८)वडगांव दिवाणी व फौजदारी न्यायालयातून राजू शेट्टी यांची निर्दोष मुक्तता झाली. 

 

 

 

यावेळी चळवळीतील सहकारी संपत पोवार,बाळासो मोरे ,प्रकाश पाटील,सतीश धुमाळ,विकास चाळके,प्रवीण पाटील, छन्नुसिंह मोहिते, सुरेश पाटील, राजू कापसे, विनायक घाटगे, अविनाश चाळके, सचिन मोरे, मारुती बोने पाटील. किरण पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्याबरोबरच २०१९ लोकसभा निवडणुकी दरम्यान आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी सुध्दा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
यावेळी सदर दोन्ही गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज अॅड. दीपक पाटील, अॅड सुधीर पाटील , ॲड अरुणा पाटील यांनी विनामुल्य काम पाहिले याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले.