कुंभोज (विनोद शिंगे)
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डॉ. समृद्धी धर्मराज शिंदे यांनी दंतवैद्यकशास्त्र (BDS) पदवी संपादन केली असून, त्यांच्या या यशाबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर आणि पाटील परिवार, बच्चे सावर्डे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांचे आई-वडील यांचा देखील विशेष सत्कार करून त्यांच्या कष्टांचे कौतुक करण्यात आले.
डॉ. समृद्धी शिंदे याचे प्राथमिक शिक्षण: कन्या विद्यामंदिर कुंभोज, माध्यमिक शिक्षण : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय भोर,उच्च शिक्षण: डी. वाय. पाटील डेन्टल स्कूल, लोहगाव, पुणे येथे झाले.या सत्कार समारंभास पत्रकार विनोद शिंगे,संभाजी चौगुले, राहुल रत्नपारखे आणि शिंदे परिवार, आदी उपस्थित होते.