रायगड अलिबाग येथील 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपुजन समारंभ

रायगड : जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथील 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपुजन समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

 

 

 

रायगड जिल्ह्यातील आरोग्य विषयक सेवा बळकट करण्यावर प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. ग्रामीण भागातील जनतेसाठी जिल्हा रुग्णालय हे अत्यंत महत्वाचे आरोग्य केंद्र आहे. या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक सेवा पुरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाने आरोग्य सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जिल्हा रुग्णालयाची इमारत उत्कृष्ट आणि दर्जेदार होण्यासाठी यंत्रणानी दक्ष रहावे. या इमारतीच्या बांधकामात कुठल्याही प्रकारची तडजोड स्विकारली जाणार नाही अशा सूचनाही दिल्या.

यावेळी उद्योगमंत्री नाम.उदयजी सामंत, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री नाम.भरतजी गोगावले, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, आरोग्य विभागाचे उपसंचालक अशोक नांदापुरकर, जिल्हा शल्य चिकत्सक रायगड डॉ.निशिकांत पाटील, डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे यांसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.