कोल्हापूर – पुलाची शिरोली येथील श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याचा शुभारंभ दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते वीणा पूजनाने करण्यात आला.
आमदार अमल महाडिक यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन सर्वांचे कल्याण करण्याची शक्ती देण्याची प्रार्थना केली. दुरितांचे तिमिर जावो अशी प्रार्थना परमेश्वराकडे करणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणामुळे अवघा परिसर भक्तीमय बनला होता.
यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील, कृष्णात करपे, सुरेश पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि वारकरी बांधव उपस्थित होते.