कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डॉ. अण्णासाहेब गुरव, डॉ. दीपा इंगवले, डॉ. तेजपाल मोहरेकर, उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.