कोल्हापूरः पृथ्वीतलावरील मानवाचे स्थान नगण्य असून त्यांनी लावलेल्या शोधाच्या पलिकडेदेखील विश्वाचा पसारा अफाट असल्याचे मत खगोल शास्त्रज्ञ किरण गवळी यांनी व्यक्त केले. त्यांनी यूरोप, अमेरिकेच्या तुलनेत भारताची वैज्ञानिक प्रगती अल्प असल्याची खंत ही व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात बुधवारी आयोजित ‘’विश्वाचा पसारा’ या कार्यक्रमात गवळी बोलत होते. यावेळी त्यांनी ग्रह, तारे, नक्षत्रे, राशींसह ब्रुनो, गॅलेलिओ, न्यूटन पासूनचा सुनीता विलियम्सपर्यंतचा प्रवासाचे अवकाशदर्शन पीपीटीच्या माध्यमातून करून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी होत्या. प्रस्तावना डॉ. प्रकाश मुंज यांनी, तर आभार डॉ. संतोष कोळेकर यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. सी. ए. लंगरे, डॉ. ए. एम. सरवदे, डॉ. राजश्री बारवेकर, प्रा. अनिल मकर, डॉ. प्रकाश निकम, डॉ. अक्षय भोसले, डॉ. सुवर्णा गावडे, हेमंत जाधव, अविनाश कांबळे, आनंद बेडगे, मंदार शिंदे यांच्यासह हिंदी व इंग्लिश अधिविभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, संशोधक उपस्थित होते.