प्रतिनिधी सुदर्शन पाटील
माघ शुद्ध तृतिया या दिवशी संपन्न होणारी माघी गणेश जयंती पश्चिम पन्हाळा परिसरातील विविध गणेश मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी बाजार भोगाव येथील गणेश मंदिरामध्ये हजारो भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले.पहाटे पूजा व अभिषेक झाल्यानंतर श्री गणेशाची विधिवत सांलंकृत अलंकारिक स्वरूपातील पूजा बांधण्यात आली होती.
दुपारी ठिक 12 वाजून 15 मिनिटांनी जन्मकाळ सोहळा संपन्न झाला या जन्मकाळ सोहळ्या वेळी उपस्थित महिलांनी श्री गणेशाची महती सांगणारी पाळणा गीते गायली माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेश मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. तर उद्या रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धिविनायक गणेश मंदिर बाजार भोगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.