घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी

कोल्हापूर – संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी घुसून हल्ला करणार्‍या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली. तो बनावट नावाने मुंबईत वास्तव्य करत होता. केवळ मुंबईच नव्हे, तर नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर यांसह राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. यातून राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ, रोजगाराची समस्या, तसेच खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणार्‍यांचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचे दिसून येते.

 

 

 

 

सरकारने देशभरात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवावी आणि घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी 27 जानेवारीला शिवाजी महाराज चौक येथे घंटानाद करून हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी 175 हून अधिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. देशव्यापी होणार्‍या या आंदोलनाचा कोल्हापूर येथे शंखनाद करण्यात आला.

या आंदोलनात हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष  गजानन तोडकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवळ आणि किरण कुलकर्णी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि  राजश्री तिवारी, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक  सुनील सामंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक अभिजित पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवर – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  उदय भोसले, विकास जाधव, विश्‍व हिंदु परिषदेचे अनिल दिंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  सुशील भांदिगरे आणि  शशी बीडकर, अशोक गुरव, संजय माळी, हिंदू महासभा महिला आघाडीप्रमुख  शिलाताई माने, हिंदू महासभेचे  राजू तोरस्कर, संप्रदाय जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे

रत्नागिरीतील चिपळूण १३ बांगलादेशी नागरिकांपैकी ३ जणांनाच अटक करण्यात आली; त्यातही पोलिसांनी हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना जामीन मिळाला, ही अतिशय गंभीर बाब आहे. नवी मुंबई, ठाणे, सोलापूर,पिंपरी-चिंचवड आदी शहरी भागांमध्येही शेकडो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक झाली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १८ हजारांहून अधिक बेकायदेशीर घुसखोर राहत असल्याचा अंदाज आहे. तरी राज्यात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवावी; या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्हे, शहरे, तालुके येथील संशयित ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ / ‘कोंम्बींग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे; बनावट ओळखपत्रे तयार करणार्‍या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी; भाड्याने खोली देण्याआधी घरमालकाने भाडेकरूंची, तसेच कामावर ठेवतांना कामगारांची योग्य ती चौकशी करावी, संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे; घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या.