कोल्हापूर :आज सोमवार दिनांक 27 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची भेट घेऊन कोल्हापूर मध्ये चाललेल्या अनेक प्रकारच्या अवैध व्यवसाय संदर्भात व महत्त्वाचे कोल्हापूर नशिले पदार्थ मुक्त करा याविषयी मागणी केली.
कोल्हापूर जिल्ह्यामधील झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या ट्रेडिंग व्यवसाय , मटका,गुटखा ऑनलाईन लॉटरी, कॅसिनो, कॅफे,मीटिंग पॉइंट,चंदगड तालुक्यातील शिनोळी गावामध्ये गोव्याच्या धरतीवर राजरोसपणे चाललेला कॅसिनो जुगार अड्डा संदर्भात संबंधित डी वाय एस पी यांच्यामार्फत कारवाई करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.
गुन्हे अन्वेषण शाखा व आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या जातात परंतु संबंधित अधिकारी व त्यांचे वर्षानुवर्षे असलेले कर्मचारी या तक्रारींकडे दुर्लक्षित करीत असतात. भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्ये अवैध व्यवसाय, नशिले पदार्थ या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास पुराव्यानशी थेट माझ्याशी संपर्क साधावा त्यांच्यावर कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, महेश उतुरे, मंजित माने, स्मिता सावंत, शशिकांत बिडकर, सुमित मेळवंकी, प्रसाद पोवार, युगंधर कांबळे, विशाल देशपांडे, अभिजित बुकशेट आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.”