पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर: शिंगणापूर गावाला कुस्ती व कबड्डी खेळाचा मोठा प्रदीर्घ वारसा असून गेली अनेक वर्षापासून रखडलेल्या या
परंपरेला कॅप्टन उत्तम पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा नव्याने यश आले असल्याचे मत डॉ. इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले अयोध्या
फाउंडेशन आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
विशालतीर्थ यात्रेनिमित्त ग्रामपंचायत शिंगणापूर व क्रीडाप्रेमी ग्रामस्थ यांच्या तर्फे भव्य अशा पुरुष व महिला गटातील
कबड्डी स्पर्धा पार पडल्या याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख म्हणाले की, नव्या पिढीतील तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता
सामाजिक एकता व नैतिकतेची जोपासना करत अध्यात्मिक आणि सांस्कृतिक विचाराच्या चौकटीवर गावचा आदर्श वृद्धिंगत
करण्यासाठी कार्य केले पाहिजे.
यावेळी डॉ. इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रमातून समाजभान जोपासणारे
तरुण,यशस्वी विद्यार्थी, खेळाडू, उद्योजक व महिलांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच खुल्या गटातील कबड्डी
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभही पार पडले यामध्ये खुल्या पुरुष गटामध्ये छावा क्रीडा मंडळ, शिरोली पुलाची हा विजेता संघ तर जय
किसान मंडळ वडणगे हा उपविजेता संघ ठरला आणि महिला गटामध्ये साधना संघ म्हालसवडे हा विजेता तर जय हनुमान क्रीडा
मंडळ बाचणी याने उपविजेत्या चषकावर आपले नाव कोरले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये मुलांच्या एकूण १० तर मुलींच्या
०५ संघांनी आपला सहभाग नोंदवला तर पंच म्हणून शिवाजी मगदुम, रमजान देसाई, गजानन पाटील व विशाल पाटील यांनी काम
पाहिले.
यावेळी क्रीडा महर्षी विजय जाधव, कोल्हापूर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी पाटील तर उपाध्यक्ष
बी.एच.पाटील तसेच यशवंत सहकारी बँकेचे चेअरमन महेश पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत काकडे, जीएसटी विभागाचे
माजी कमिश्नर किरणकुमार साळुंखे, लोकनियुक्त सरपंच सौ. रसिका पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील, राष्ट्रीय कबड्डीपटू
मोहन लोहार व वस्ताद तुकाराम लोहार आनंदा पाटील, सर्जेराव मस्कर, पंडित मस्कर, मंगेश पाटील, रविनाना, भैय्या पाटील, पिंटू
सौंदलकर, नारायण चौगले, कृष्णात चौगले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व क्रीडाप्रेमी ग्रामस्थ – नागरिक तसेच जिल्हा परिषद
प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.