कुंभोज येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात 

कुंभोज (विनोद शिंगे)
भारतीय लोकशाही ही एकता व अखंडतेचे प्रतीक आहे ती आणखीन मजबूत व्हावी, मतदारांनी मतदानाबाबत अधिक जागृत व्हावे व लोकशाही आणखीन बळकट करावी या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने 25 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, कुंभोज सकल कार्यालयाच्या वतीने कुंभोज येथील सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर मठात 15 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती तसेच संविधान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

 

सरपंच स्मिता चौगुले यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आला .”मतदार राजा जागा हो; लोकशाहीचा धागा हो ! “मतदान आमचे – राष्ट्रीय कर्तव्य, मत द्या – आपला आवाज ऐकू द्या ! , “जना – मनाची पुकार मतदान आपला अधिकार” यासारख्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. यावेळी कुंभोज सर्कल श्री शेटे तलाठी चव्हाण व सर्कल कार्यालयातील अधिकारी व नूतन मतदान मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय दाखले मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले तसेच हातकणले तालुका महा-ई-सेवा केंद्र संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वैभव जमणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थित अधिकारी वर्गाच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विनोद शिंगे व आभार उपसरपंच अशोक आरगे यांनी मांनले.