कोल्हापूर : युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा चंदगड तालुक्यातून सुरू केला. मलतवाडी येथे खासदार धनंजय महाडिक यांनी विविध विकासकामांसाठी निधी प्रदान केला, ज्यात काँक्रीटसाठी 5 लाख, पानंद रस्त्यासाठी 28 लाख, आणि तालीम व जिमसाठी 17 लाखांचा समावेश आहे.
त्यांनी कोवाड स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलला भेट दिली तसेच शासकीय आश्रमधाम येथील दोन मुलांना दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. दुडगे, चिंचणी आणि चेनहट्टी येथे महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते शाखा उद्घाटन करण्यात आले.
कृष्णराज महाडिक यांनी राजगोळी खुर्द येथे 12 कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला, तर राजगोळी बुद्रुक येथे दत्त हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी संवाद साधला.
दिंडेलकोप व तळगोळी येथे ग्रामस्थ, सरपंच आणि सदस्यांशी गावविकासाबाबत सखोल चर्चा केली.
कृष्णराज महाडिक हे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे आणि समाजसेवेतील उत्कटतेमुळे ओळखले जातात. त्यांनी युवकांना प्रेरित करण्याबरोबरच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि जनतेशी सुसंवाद साधण्याच्या कौशल्यामुळे ते एक प्रभावी युवा नेतृत्व म्हणून नावारूपाला आले आहेत.