पन्हाळा: सहकारमहर्षी पुरस्कार प्राप्त वारणा बझार या सहकारी ग्राहक संस्थेच्या हळदीकुंकू कार्यक्रमात डाबर इंडिया लि.बादशहा मसाले व जॉन्सन अॅन्ड जॉन्सन प्रा लि या कंपन्यानी सहभाग घेतला संस्थेच्या वतीने बादशहा बिर्याणी मसाला वापरून तादळापासून बनविलेल्या तिखट पदार्थ आणि डूरम गव्हापासुन तयार केलेल्या KEM शेवया पासुन बनविलल्या गोड पदार्थ (खीर) आयोजीत पाककृती स्पर्धमध्ये तिखट पदार्थांतून अपूर्वा पिळणकर व गोड पदार्थामधून हर्षदा पोतदार यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
वारणानगर येथील वारणा बझारमध्ये हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता पाककृती स्पर्धात १०५ महिलानी सहभाग नोंदविला गोड व तिखट पदार्थ सर्व गटातील विजेत्या महिलांना वारणा बझार ब बादशहा मसाले यानी प्रमाणपत्र व बक्षिसे देवून गौरविले.
वारणानगर येथे पार पडलेल्या या हळदी कुंकू वारणा-कोडोली परिसरातील सुमारे ५ हजार सभासद भगिनीनी लाभ घेतला ग्राहक संस्थेच्या माध्यमातून ४८ वर्षाच्या कालावधीत संपूर्ण देशभरात नावलौकीक प्राप्त केलेल्या आणि १६५ कोटी रूपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या वारणा बझारच्या वतीने सभासद भगिनींसाठी सालाबादप्रमाणे संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे याच्या मार्गदर्शनाखाली हळदीकुंकू व पाककृती स्पर्धेचे आयोजन केले होते.
वारणा महिला उद्योग समुहाच्या अध्यक्षा कै.शोभाताई कोरे यांच्या प्रेरणेतून उपक्रम सुरू झाला आहे वारणा बझारच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते वारणानगर येथून या हळदीकुंकू कार्यक्रमाचा शुभारंभ करणेत आला.
यावेळी वारणा महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्षा राजश्री कळत्रे, संचालिका शारदा महाजन,शोभा साखरपे, सामाजीक कार्यकर्त्या प्रज्ञा पाटील,शशिकला चव्हाण,संध्या पाटील, उज्वला जाधव, गितांजली पाटील, बझारच्या संचालिका शारदा मुळीक,बबुताई महापुरे,शोभा पाटील,स्मिता कापरे,मनिषा पाटील, इतर मान्यवर उपस्थित होते.
वारणा बझारचे सरव्यवस्थापक
शरद महाजन यांनी माहिती देवून बादशहा मसालेचे चंद्रकात आहिवळे,संजय सारडा,डाबर इंडिया लि चे सम्राट पांगरकर, जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या मुक्ता तिवारी, जयदिप व्यास, सिध्दी विनायकचे कृष्णा पवार यांनी आपली दर्जेदार उत्पादने भेट म्हणून देऊन कार्यक्रमास सहकार्य केलेबद्दल त्याचा सत्कार केला. दि.२४ जानेवारी रोजी संस्थेच्या शाखा वडगाव येथे होणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमांस सर्व महिला सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन केले पाककृती स्पर्धेचे परिक्षण प्राची पाटील व प्रियांका केंबळकर यांनी केले.
बझारचे शिवाजी पाटील, दिलीप पाटील,महेश आवटी,संदीप पाटील तानाजी ढेरे,हणमंत दाभाडे,रघुनाथ मलगुंडे आदींनी यांनी नियोजन केले. वैष्णवी चव्हाण आणि तानाजी ढेरे यानी सुत्रसंचलन केले.
स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे
गोड पदार्थ खीर : प्रथम – हर्षदा पोतदार (वारणानगर)
दवितीय-जयश्री चव्हाण ( कोडोली )
तृतीय- गायत्री बागणे (वारणा),
उत्तेजनार्थ -स्वाती वारकरी (कोडोली),
तांदळापासून तिखट पदार्थ – प्रथम – अपूर्वा पिळणकर (नवेपारगांव),
द्वितीय : स्नेहल चिमटे, ( नवे पारगांव) तृतीय : अर्चना सुतार (तळसंदे), उत्तेजनार्य : कुसुम शिंदे (वारणा) ,