शिंगणापूर यात्रेत अयोध्या फौंडेशन मार्फत विविध कार्यक्रम -कॅप्टन उत्तम पाटील

शिंगणापूर : यंदा विशाळतीर्थ यात्रेनिमित्त अयोध्या फौंडेशन व ग्रामपंचायत शिंगणापूरच्या संयुक्त विद्यमानाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा प्रांगण येथे दि. २४ जाने. रोजी खुल्या गटातील पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे तर दि. २५ जाने. रोजी शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचे प्रेरणादायी व्याख्यान तसेच २९ जानेवारीला खुल्या पुरुष व महिला गटामधें कुस्तीच्या स्पर्धा होणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन उत्तम पाटील यांनी दिली आहे.

 

 

यावेळी डॉ. इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजभान जपणारे तरुण, यशस्वी विद्यार्थी, खेळाडू व महिला तसेच यशस्वी उद्योजकांचा सत्कार समारंभ होणार असून याच वेळी स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाचे बक्षीस वितरणही केले जाणार आहे. याप्रसंगी शिंगणापूरसह आसपास परिसरातील क्रीडाप्रेमी विद्यार्थी,भगिनी-महिला, तरुण व सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कॅप्टन पाटील यांनी केले आहे.