अर्थसंकल्पामध्ये राज्यात 2 कॅन्सरवरील रुग्णालये सुरू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाचा परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि प्रस्तावित कॅन्सर केअर हॉस्पिटल मेयो क्लिनिक यांच्यातील लेटर ऑफ इंटेन्टवर स्वाक्षरी करण्यात आली. यानिमित्ताने शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या ‘लीलावती इनिशिएटिव्ह’ या विशेष कार्यक्रमाला मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहून रुग्णालय, डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी वर्गास शुभेच्छा दिल्या.येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये राज्यात 2 कॅन्सरवरील रुग्णालये सुरू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

 

 

रुग्णालयाच्या वतीने कॅन्सरवरील उपचाराकरीता 300 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी अमेरिकेतील मेयो क्लिनीक यांचे समवेत करार करत उत्तम व दर्जेदार उपचार सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री नाम.आशिषजी शेलार, परिवहन मंत्री नाम.प्रतापजी सरनाईक, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मेयोक्लिनिक यूएसएचे सीईओ बिजू सॅम कुट्टी तसेच लीलावती रुग्णालयाच्या संचालक श्रीमती चारू किशोर मेहता आणि रुग्णालयातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.