कोल्हापूर : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे रामलल्ला पालखी सोहळा व शोभायात्रा उदघाटन संपन्न झाले. हा सोहळा केवळ एक उत्सव नसून, आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. रामलल्लांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी सत्य, धर्म आणि कर्तव्य या मार्गावर चालण्याचे शिकवले. असे यड्रावकर म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले,निर्मल पोरवाल, राजेंद्र दाईगडे,सुनील बंडगर,प्रवीण राजोपाध्ये,अभिजीत भांदीगिरे, सुनील ताडे,प्रकाश उर्फ मामा निटवे, राजू मालपाणी,प्रवीण गाणबावले,संजय वायचळ,भगवंत जांभळे,शुभम ताडे आदी मान्यवर व राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.