सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा- संजय पवार

कोल्हापूर –छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये वर्षानुवर्षे असणारे अतिक्रमण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  हसन मुश्रीफ यांनी सी. पी.आर परिसरातील असणारी सर्व अतिक्रमणे तातडीने काढण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिला होता. जेणेकरून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ये जा करण्यासाठी व दुर्दैवानं काही अपघात किंवा आग लागल्यास संबंधित यंत्रणेला कोणताही अडथळा येऊ नये व जीवित हानी होऊ नये यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे.

 

 

 

अतिक्रमण असल्यानंतर कोणतीही नोटीस किंवा सूचना देण्याची गरजच नसते व त्याचप्रमाणे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा उद्भवत नाही. ज्या लोकांनी अतिक्रमण केले त्यांना वीज पुरवठा व पाणीपुरवठा कोणी दिला? याचीसुद्धा नामदार हसन मुश्रीफ यांनी तातडीने चौकशी करावी व विनापरवाना वीज जोडणी व पाणी जोडणी घेतले असल्यास चोरीचा गुन्हा नोंद करावा व राहिलेले अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे. कारण अतिक्रमण महत्त्वाचे नसून माणसांचा जीव
महत्त्वाचा आहे. खरे तर हा सरकारी दवाखाना असून कोणती भाजी मंडई किंवा मटन मार्केट नाही हे सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. अतिक्रमण काढणे म्हणजे तेथील जागा रिकामी करणे. कुलूप लावून साखळ्या लावणे असे होत नाही. प्रशासनाने कुलपे व साखळ्या लावण्याचे कारण स्पष्ट करावे. कदाचित प्रशासनाचे व अतिक्रमण धारकांचे भविष्यात सेटलमेंट तर नाही ना याची खातरजमा नामदार मुश्रीफ साहेब यांनी करावी. तसेच सरकारी कामात अडथळा व न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी बी. एन. एस १३२ प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे नोंद करून शासनाला, व मा. न्यायालयाला सविस्तर अहवाल पाठवावा अन्यथा न्यायालयाच्या
अवमान प्रकरणी प्रशासनाच्या विरोधात आम्हाला दाद मागावी लागेल.