कुंभोज ( विनोद शिंगे)
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे “ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या सीबीएसई बोर्ड मार्फत विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चे विशेष प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी, डॉ. विवेक कायंदे (रजिस्टार संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर ) श्री विपिन भार्गव, उपसंचालक, ISTM (इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटेरियट ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट) डॉ. सुनील धापटे, संचालक, ओमिटा कन्सल्टन्सी,
श्री. राजीव गर्ग, (प्राचार्य, दत्ता मेघे वर्ल्ड अकादमी, ठाणे,)
मिस पल्लवी, (सेक्शन ऑफिसर, CBSE RO पुणे,)
सस्मिता मोहंती, (व्हेन्यू डायरेक्टर आणि संचालिका-प्राचार्या, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल,) शिल्पा कपूर (डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग कॉर्डिनेटर ) श्री मंदार पसरणीकर (डेप्युटी डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग कॉर्डिनेटर )
तसेच सीबीएसईचे नामांकित प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि विविध शाळांचे प्राचार्य उपस्थित होते.
CBSE च्या “ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शिक्षकांना नवीन शिक्षण पद्धती, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करणे हा आहे. या उपक्रमाद्वारे शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये सुधारणा होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे ध्येय आहे.
यावेळी बोलताना, श्री. विपिन भार्गव यांनी शिक्षकांसाठी प्रशासकीय प्रशिक्षणाचे महत्त्व विषद केले. डॉ. सुनील धापटे यांनी अभ्यासक्रमातील नाविन्यता आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. श्री. राजीव गर्ग यांनी शिक्षण व्यवस्थापन आणि शिक्षकांची भूमिका यावर विचार मांडले.
याप्रसंगी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागत गीत आणि थीम बेस्ड डान्स कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करून दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. उपस्थित शिक्षक आणि प्रशिक्षकांनी विविध सत्रामध्ये सहभाग घेतला आणि CBSE च्या नवीन उपक्रमांची व कौशल्यांची माहिती घेतली.
या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन दृष्टिकोन प्राप्त होईल आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास विवेक कायंदे यांनी व्यक्त केला.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेतलेला पुढाकार शैक्षणिक क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.