भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कणेरीवाडी येथे महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

कोल्हापूर : भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कणेरीवाडी येथे महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणस्थळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन भागीरथी महिला संस्थेचे अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

भारतीय संस्कृती जपण्याचं काम महिलांनी केलं आहे. महिलांमध्ये उपजत क्षमता आणि कौशल्य असतात. त्यातून संपूर्ण कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत. साठी त्याला बचत गटाची साथ मिळेल. या संस्थेच्या मार्फत महिलांसाठी विविध वस्तू बनवण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा, असे आवाहन अरुंधती महाडिक यांनी यावेळी केले.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये गंगादेवी महिला बचत गट, मणिकर्णिका महिला बचत गट, काडसिद्धेश्वर महिला बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी झालेल्या महिलांना प्रशिक्षिका मा. अश्विनी वास्कर यांनी प्रशिक्षण दिले.

याप्रसंगी सुषमा मोरे कल्पना भोसले माधवी भोसले अरुणा पोळ तेजस्विनी मोरे अंजना पोळ माझी मगदूम जगदीश वाठारकर आबाजी शेळके बाजीराव खोत सागर भोसले नितीन खोत कावेरी वाठारकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

🤙 9921334545