कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी व भागीरथी महिला संस्था यांच्या वतीने गृहनिर्माण कॉलनी पाचगाव येथे महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांशी संवाद साधला.
महिलांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गेली 15 वर्षे भागीरथी महिला संस्था कार्यरत आहे. कमी गुंतवणूक करून जादा नफा मिळवणे तसेच प्रत्येक महिलेने आर्थिक बचत करून आपले कुटुंब अधिक सक्षम बनवले पाहिजे. हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून भागीरथी महिला संस्था महिलांना सक्षम करण्याचं काम करत आहे. भागीरथी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी महिलांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. याचा अधिक लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन सौ. महाडिक यांनी यावेळी केले.
या शिबिरामध्ये शिवशक्ती महिला बचत गट, स्त्री शक्ती महिला बचत गट, आदिशक्ती महिला बचत गट, नारीशक्ती महिला बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी सहभागी महिलांना प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी पुनम गवळी, नीलिमा कुलकर्णी, अवनी सुभेदार, रोहिणी पाटील, यशोदा ढोणे, सई शिर्के, अमोल गवळी उपस्थित होते.