कोल्हापूर: माजी महापौर मारुतराव कातवरे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा आणि अमृत- कलश गौरव अंक प्रकाशन समारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शाहू स्मारक येथे संपन्न झाला.
आ. सतेज पाटील यांनी बिकट परिस्थितीतही ज्या आत्मियतेने आणि कळकळीने मारुतराव कातवरे यांनी सामाजिक बांधिलकीतून काम केले ते खरोखरच कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी बोलताना व्यक्त केली.
या सोहळ्याला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शाहू उद्योग समूहाचे समरजीत घाटगे, शिवसेना उपनेते संजय पवार, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, कॉ. दिलीप पवार यांच्यासह अॅड. महादेवराव आडगुळे, सुभाष बुचडे, सुरेश शिपुरकर, सतीश दरेकर, अनिल घाटगे, डॉ. प्रकाश कुंभार, सतीश बाचणकर, बबनराव वडणगेकर, संभाजी ठाणेकर, मनोहर पाडळकर तसेच सत्कार सोहळा कृती समितीचे सदस्य आणि कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.