कुंभोज (विनोद शिंगे)
रांची येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी सोनी स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या ४ खेळाडूंची निवड झाली. स्पर्धेसाठी १९ वर्ष वयोगटातील खेळाडूंची उंच उडी लांब उडी व तिहेरी उडी या क्रीडा प्रकारांसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली. त्यांचा कॅम्प छत्रपती संभाजीनगर येथे झाला. हे सर्व खेळाडू रांची येथे स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.
संघामध्ये अनुक्रमे विशाल सिंग, उंच उडी रेहान पटाईत उंच उडी, अभिषेक शर्मा लांब उडी व तिहेरी उडी आणि मयुरी कुपटे हिची उंच उडीसाठी निवड झाली, सोनी स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या अध्यक्ष दिपाली लोटे, उपाध्यक्ष संदीप चव्हाण, सेक्रेटरी दीपक इदाते, खजिनदार संतोष रेडेकर यांनी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार केला. अकॅडमीचे तानाजी भोसले, बाबासाहेब कांबळे, संतोष पाटील, संजीवनी पिष्टे, सौ. सातपुते, सौ. निर्मळे उपस्थित होत्या. आभार दिपक इदात यांनी मानले.