कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे)
स्वामी विवेकानंद यांच्यावर कुटूंबामधून संस्कार झाले. भारत देश हा जगद्गुरु व्हायचा असेल तर ज्ञान, विज्ञान व सुसंस्काराने प्रेरित होणारी पिढी निर्माण व्हायला हवी. असे स्वामी विवेकानंद यांचे विचार होते. भारतीय संस्कृतीचा अभ्यास समजून घ्यायचा असेल तर स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा अभ्यास व्हायला हवा. भारताची परंपरा आणि आधुनिक विज्ञान याना जोडणारा दुवा म्हणजे स्वामी विवेकानंद. विज्ञान, तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड आवश्यक आहे.
शरीर, मन यांना जोडणारे चरित्र्य निर्माण व्हावे हे स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत होते. स्वामी विवेकानंद हे अष्टपैलू व्यक्तिमत्व् होते. चारित्र्य घडविणारे शिक्षण हवे, स्त्रियांना शिक्षण देणे, मातृभाषेतून शिक्षण हवे, अंत:करणातील चैतन्याचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण . असे विचार मा. सुनिल कुलकर्णी यांनी येथील विवेकानंद कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद जयंती निमित्त् प्रमुख पाहुणे म्हणून असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.
अध्यक्षीय मनोगतात बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, आजच्या शिक्षकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार विद्यार्थ्यामध्ये रुजवायला हवेत. आत्मानंद शोधण्याचे कसब शिक्षकात आहे. अध्यात्मिक जीवनाचा प्रभाव शांतताप्रिय देश म्हणून भारतावर झालेला आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्यावर असल्याने शिक्षणसंस्थेला त्यांनी स्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांचे व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर.कुंभार यांनी केले.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौ. शिल्पा भोसले यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. संदीप पाटील यांनी करुन दिला. आभार डॉ. बी. टी. दांगट यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा.समीक्षा फराकटे व प्रा.सुप्रिया पाटील यांनी मानले. या प्रसंगी आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ.श्रुती जोशी, प्रा.एस.पी.थोरात, प्रा.डॉ.ई.बी.आळवेकर, प्रा.विश्वंभर कुलकर्णी, प्रा.एम.आर. नवले, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, संस्था परिसरात असलेल्या विविध संस्कार केंद्रातील ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.