मंत्री आबिटकरांचा राधानगरी जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने नागरी सत्कार

कोल्हापूर : राज्याचा आरोग्य मंत्री म्हणूनप्रकाश आबिटकर यांची निवड झालेबद्दल राधानगरी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते व नागरीकांनी नागरी सत्काराचे आयोजन केले होते. या सत्कार समारंभास उपस्थित राहून सत्काराचा स्विकार केला.

 

 

ज्यांनी मला आमदाराचा नामदार केले, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबर राधानगरी तालुक्याची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण होईल असे काम करण्याचा निर्धार केला आहे कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज या ठिकाणी आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या समस्यांच्या समाधानासाठी नेहमीच पुढाकार घेऊ. आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचे आबीटकरांनी सांगितले.

यावेळी राधानगरी तालुक्यातील प्रमुख नेते, राधानगरी जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख नेते, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545