कुंभोज(विनोद शिंगे)
कुंभोज गावच्या शिरपेच्या पुन्हा एकदा मानाचा तुरा,केंद्रीय होमिओपॅथिक संशोधन परिषद (CCRH) अंतर्गत STSH 2023 मध्ये संपूर्ण भारतातील संशोधन प्रकल्पासाठी निवडलेल्या 190 विद्यार्थ्यांपैकी 76 विद्यार्थी प्रकल्पांना पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 4 विद्यार्थी महाराष्ट्रातून निवडले गेले आहेत. त्यामध्ये प्रतिक्षा महावीर नकाते यांची निवड करण्यात आली आहे.
कै. श्रीमती हौसाबाई होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल निमशिरगाव या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. या संशोधनासाठी प्राचार्या डॉ.शुभांगी मगदुम, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. अश्विन कुलकर्णी, डॉ. पद्मावती कुंभार, डॉ. अभिजित कोरे व कुटुंबाचे मोलाचे सहकार्य लाभले. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे मार्च महिन्यात होणार आहे.