आपटेनगर रिंगरोड व हॉकी स्टेडियम येथील अनाधिकृत बांधकाम व पत्र्याचे रुफ काढले

कोल्हापूर  : बोंद्रेनगर, आपटेनगर रिंगरोड येथे रो हाऊसच्या पुढील सामासिक अंतरामधील दोन दुकान गाळे व बी वॉर्ड हॉकी स्टेडियम येथील ग्रीलवरील रुफचे अनाधिकृत बांधकाम केलेले आज काढण्यात आले. यामध्ये ए वॉर्ड रिसन.239/क/पै प्लॉट नं.1पैकी बोंद्रेनगर आपटेनगर रिंगरोड येथे 5.25 मीटर x 4.25 मीटर मापामध्ये दोन दुकान गाळ्याचे विना परवाना बांधकाम करून त्यांचा वापर सुरू होता.

 

 

त्यानुसार मिळकतदार रणजीत विलासराव सरावणे व सौ अश्विनी रणजीत सरावणे यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53 (1) अंतर्गत दिनांक10 सप्टेंबर 2024 रोजी सदरचे विनापरवाना बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. त्याचप्रमाणे बी वॉर्ड हॉकी स्टेडियम येथील रि.स.नं.599 अ पैकी प्लॉट नंबर 2 मधील पश्चिमेकडील सामासिक अंतरामध्ये 3.00 मीटर x 1.25 मीटर मापामध्ये वीट बांधकामामध्ये व्हरांड्यामध्ये ग्रील बसवून वरती पत्र्याच्या रूफचे विना परवाना बांधकाम इंद्रजीत आनंदराव पावले व इतरांनी केले होते. सदरचे विनापरवाना बांधकाम दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी ने 53 (1) अंतर्गत काढून घेण्याकरीता नोटीस बजाविण्यात आली होती. परंतु संबंधितांनी सदरचे बांधकाम मुदतीत काढून न घेतल्यामुळे शुक्रवारी नगररचना विभाग, विभागीय कार्यालय क्रमांक 1, विद्युत विभाग व पोलीस बंदोबस्तामध्ये दोन्ही ठिकाणाचे विनापरवाना बांधकाम काढून टाकण्यात आले.

            सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संचालक नगररचना विनायक झगडे व उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सुनील भाईक, चेतन आरमाळ व कर्मचारी-यांनी केली.

🤙 9921334545