कोल्हापूर : घरफाळा विभागीय कार्यालय क्र. 4 अंतर्गत व्हिनस कॉर्नर परिसरामधील यशवंतराव उर्फ बाळासाहेब गोविदराव कोळसे, कुळ- अनिल रावबहादुर श्रेष्ठ, कुळ- उत्कर्ष एंटरप्रायजेस या मिळकतीमधील तीन गाळयांची सीलची कारवाई आज करण्यात आली.
यानुसार घरफाळा विभागाकडे दि.01 एप्रिल 2024 ते 10 जानेवारी 2025 अखेर 89,988 मिळकतधारकांकडून रक्कम रु.44,29,86,046/- रक्कम जमा करण्यात आलेली आहे. शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करुन देखील काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
तरी शहरातील सर्व थकबाकीदारांना पुन:च जाहीर आवाहन करण्यात येते की, ज्यांनी अद्यापही आपला घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही.त्यांनी आपला थकीत घरफाळा भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार मिळकत सिल किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.