माझ्या सर्व निवडणुकीचे सारथ्य भैय्या माने यांनी केले : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे सरसेनापती प्रताप उर्फ भैयासाहेब माने यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त भैय्या माने व सविता माने यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या व वाढदिवसानिमित्त आयोजित कॉमेडी शार्प शूटर विनोदी अभिनेते भाऊ कदम यांच्या सिरीयल किलर नावाच्या हास्य विनोदी कार्यक्रमास उपस्थिती लावली.

 

 

हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून भैय्या माने यांनी स्थान निर्माण केले आहे. माझ्या सर्व निवडणुकीचे सारथ्य त्यांनी केले आहे. शिक्षणप्रेमी वाय.डी. माने आण्णांनी सुरू केलेले शैक्षणिक कार्य ते यशस्वीरित्या सांभाळत असून भविष्यात आणखी पुढे नेतील.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, सतीश माने, सुनील माने, प्रकाश नाळे, शशिकांत खोत, सुनील सूर्यवंशी, भूषण पाटील, नवल बोते, प्रवीण काळबर, सुनील सूर्यवंशी, रवींद्र पाटील, अजित कांबळे, सतिश घाडगे, सौरभ पाटील, संजय ठाणेकर, सुनील माळी, सतीश पोवार, अर्जुन नाईक, संग्राम लाड, बच्चन कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545