कुंभोज प्रतिनिधी :- (विनोद शिंगे)
हातकणंगले तालुक्यामधील बांधकाम कामगारांचे तालुका सुविधा केंद्र बनले धोकादायक कामगारांचा जीव धोक्यात सांगली कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालगत आहे .हे सुविधा केंद्र अन्यत्र ठिकाणी हलवण्याची बांधकाम कामगार वर्गाची मागणी कामगारांच्या नवीन नोंदणी रिन्यूअल व इतर लाभाचे अर्ज विधानसभा निवडणुकीनंतर राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र बांधकाम इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणी करण्यासाठी कामगार सुविधा केंद्र कार्यालय चालू केले आहे .
त्याच कार्यालयामधून सर्व बांधकाम कामगारांचे ऑनलाईन नोंदणी रिन्यूअल व विविध लाभाचे अर्ज भरण्याचे काम सध्या चालू आहे .तरी हातकणंगले तालुक्यामध्ये गावची संख्या ६२ इतकी आहे .त्यामध्ये ४ शहराचा समावेश आहे. बांधकाम कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे .तरी सदरच्या बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी व रिन्यूअलचे अर्ज भरण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून रांगेत उभे राहावे लागते .तसेच प्रचंड गर्दी असते हे कार्यालय कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्ग लगत असल्याकारणाने हे कार्यालय बांधकाम कामगारांना धोकादायक नाहक त्रासदायक आहे .ना पिण्यास पाण्याची सोय ना सावलीची सोय सर्व बाबतीत गैरसोयी आहे .बिचारा कामगार दिवसभर उन्हात ताटकळत राहत असतो .कामगारांच्या लांबच लांब रांगा रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते.
तरी हे महाराष्ट्र बांधकाम कामगार सुविधा केंद्र ऑफिस येथून हलवून दुसरीकडे स्थलांतरित करावे अशी मागणी बांधकाम कामगार वर्गाची आहे . कामगार सुविधा केंद्रामध्ये सर्व बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणी व रिन्यूअल करण्यासाठी फक्त ५० टोकन दिले जाते. व बाकीच्या कामगारांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागते तसेच सदरचा बांधकाम कामगार कामावर न जाता ६०० ते ७०० रुपये हजेरी बुडवून सदरच्या कामगारांना ताटकळत उभा राहावे लागते. तरीदेखील सदरचा बांधकाम कामगारांचे ऑनलाईन काम वेळेवर होत नाही .
तरी इचरकंजीचे सहाय्यक कामगार आयुक्त सौ भोईटे मॅडम यांनी बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी व रिन्यूअल व विविध लाभाचे अर्ज भरण्यासाठी इचरकंजी शहरांमध्ये एक कामगार सुविधा केंद्र कार्यालय चालू करावे अशी मागणी बांधकाम कामगार वर्ग यांच्याकडून होत आहे