कै.शिवाजी तांदळे यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम 

पुणे – पुणे खडकवासला येथे युवा लहुजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (तात्या) तांदळे यांचे वडील कै शिवाजी तांदळे यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त युवा संघर्ष सेनेच्या वतीने वृक्षारोपण, कॅलेंडर चे प्रकाशन, रुग्णांना फळं वाटप करण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार भीमराव अण्णा तापकीर, सरपंच सौरभ नाना मते होते.

 

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथील प्रोटोकॉल विभागाचे अधिकारी अनिल तांदळे यांचे आजोबा, शाहूवाडी तालुका कृषी मंडल अधिकारी संजय तांदळे यांचे चुलते,पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्याआदर्श माता पुरस्कार श्रीमती किसाबाई शिवाजी तांदळे यांचे पती निवडे तालुका पन्हाळा येथील कै शिवाजी भाऊ तांदळे यांच्या 33 सहाव्या पुण्य स्थिती निमित्त पुण्यतिथीचा कार्यक्रम खडकवासल पुणे घेण्यात आला.

 

यावेळी नांदेड गावचे सरपंच रुपेश भाऊ घुले पाटील, माननीय दत्ताभाऊ कोल्हे, भाजप महाराष्ट्र राज्याचे सचिव अध्यक्ष भारतीताई मते, अध्यक क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समितीची माजी अध्यक्ष विजय बापू डाकले, खडकवासलाचे नेते अनिल भाऊ मते पाटील, सरपंच गोकुळ भाऊ करंजवणे, सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ मते पाटी, राजाभाऊ दुपारगुडे, गौतम बाळ शंकर,किरकटवाडी गावचे सरपंच किरण भाऊ हगवणे -पाटील, सरपंच काजल ताई हगवणे- पाटील,
इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

🤙 9921334545