कोल्हापूर : खासदार शाहू छत्रपती महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आज आमदार सतेज पाटील यांनी न्यू पॅलेसवर त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने समाजकार्यासाठी मिळणारी प्रेरणा अशीच कायम मिळत राहो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.


याप्रसंगी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, विजय देवणे, ए. वाय. पाटील, कॉ. सतिशचंद्र कांबळे, सत्यजीत दिनकरराव जाधव, सम्राट मोरे, प्रविण केसरकर, संजय मोहिते, सुजय पोतदार, अर्जुन माने, उदय फाळके, संजय पटकारे, सलीम मुल्ला, जे. के. पाटील यांच्यासह सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते.
