कसबा बावडा :-कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगाम दि. २३/११/२०२४ इ. पासून सुरू झालेला असून दि.३०/११/२०२४ अखेर एकूण २२२४९.४९३ मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे.
या गाळप झालेल्या ऊसाची एफ.आर.पी. रु.३०५०/- प्र.मे.टन प्रमाणे होणान्या ऊस बिलाची रक्कम रु.६७८.६१ लाख ऊस पुरवठादार शेतकरी सभासदांना त्यांचे बँकेतील खात्यावर जमा केली आहे. तरी संबंधित ऊस पुरवठादारांनी आपआपल्या बैंकेशी संपर्क साधून ऊस बिलाचे पेमेंट घेऊन जावे, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी केले आहे.
तसेच या गळीत हंगामासाठी सभासद शेतकन्यांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून सहकार्य करणेचे असे आवाहनही त्यांनी केलेले आहे. या वेळी कारखान्याचे चेअरमन आमदार अमल म.महाडिक, व्हा. चेअरमन गोविंदा दा. चौगले व सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक प्रकाश ज. चिटणीस उपस्थित होते.