आ. चंद्रदीप नरकेंनी दिली नंदवाळातील विठ्ठल मंदिरास भेट

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरास भेट दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार पदी निवडीबाबत ग्रामस्थांनी सत्काराचे आयोजन केले होते. त्यांच्या या प्रेमाने मी भारावून गेलो.अशी भावना नरकेंनी व्यक्त केली.

 

नरके म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा “ब” वर्ग दर्जा असणारे हे तीर्थक्षेत्र. दरवर्षी लाखो भाविक इकडे येत असतात. इथल्या सोई-सुविधांमध्ये अजून वाढ करण्याच्या दृष्टीने देखील सर्वांशी चर्चा झाली. इकडे ज्या – ज्या वेळी येऊन मनोभावे सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

🤙 9921334545