भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचे माहिती केंद्र सुरू

कोल्हापूर : भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचे माहिती केंद्र लक्ष्मी रोडवरील आदर्श भीमा वस्त्र दालन येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील महिला, व्यावसायिक, विद्यार्थी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू झालेल्या भागीरथी नागरी पतसंस्थेने ‘सहकार से समृद्ध’ हा मंत्र जपला आहे. कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या पतसंस्थेची अर्थसहाय्यक विषयक माहिती आणि विविध योजना, ठेवींबाबत सविस्तर माहिती मिळावी, यासाठी भागीरथी नागरी पतसंस्थेने माहिती केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. महाडिक यांनी केले.

आजपर्यंत या पतसंस्थेने आत्तापर्यंत गरजू महिला, युवा उद्योजक अशा विविध घटकांना कर्ज पुरवठा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले आहे. यापुढेही या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना अर्थसहाय्य करत राहू, असे मत सौ. महाडिक यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी विश्वराज महाडिक, सौ. वैष्णवी पृथ्वीराज महाडिक, सौ. मंजिरी विश्वराज महाडिक, प्राजक्ता घोरपडे, भाग्यश्री शेटके, शिवराज मगर, अरविंद पाटील, नीलम नलवडे, भिकाजी राबाडे यांच्यासह पतसंस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

🤙 9921334545