बेळगाव : महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा गुरुवार (दि.२६) पासून सुरू झाला. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे जी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल जी यांच्यासह देशभरातील अनेक काँग्रेस नेते, खासदार, आमदार आणि आजी- माजी मुख्यमंत्री यांची उपस्थिती होती.
सतेज पाटील म्हणाले, काँग्रेस अधिवेशनात देशभरातील अनेक मान्यवर नेत्यांशी संवाद साधण्याची आणि त्यांचा देशहितासाठीचा दृढ संकल्प अनुभवण्याची संधी मिळाली. १९२४ च्या अधिवेशनाच्या ऐतिहासिक वारशाची चळवळ देशभर ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अशा नावाने राबवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक वारशाला पुढे नेण्याचा काँग्रेस पक्षाचा उपक्रम माझ्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे.