भाजपा सदस्यता अभियान कोल्हापूर शहरभरात प्रभावीपणे राबवा : आ.सुधीर गाडगीळ

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात कोल्हापूर महानगरच्या वतीने आज भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न झाली. या अभियानासाठी प्रभारी म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

 

अभियानाच्या सुरुवातीला देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त अटलजींच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नूतन आमदार सुधीरदादा गाडगीळ व आमदार अमल महाडिक यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी भाजपा सदस्य नोंदणीसाठी आपण सर्वांनी ८८००००२०२४ या क्रमांकावर कॉल करून जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करावी तसेच हे अभियान शहराच्या सात मंडलामध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे आवाहन कार्यकर्त्याना केले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये प्र क सदस्य राहुल चिकोडे यांनी आजच्या सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली.

याप्रसंगी बोलताना प्रदेश सचिव महेश जाधव यांनी सदस्यता नोंदणी अभियानाची बदलती पद्धत व आगामी कार्यक्रमा संदर्भात सविस्तर माहिती उपस्थित त्यांना दिली.

खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभा अधिवेशनातील विषयांवर चर्चा करत सध्या देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काँग्रेस राजकारण करत असल्याचे सांगत काँग्रेस करत असलेला अपप्रचार आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हाणून पाडला पाहिजे असे सांगितले.

याप्रसंगी बोलताना आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, भारतीय जनता पार्टी संघटनात्मक काम करणारी पार्टी असून लोकसभेमध्ये दोन सदस्य ते  आज देशातील एक नंबरचा पक्ष त्याचबरोबर जगभरातील सर्वात मोठा सदस्य असणारा पक्ष अशी वाटचाल करणाऱ्या भाजपाचे स्वप्न अटलजींनी पाहिले होते ते आज त्यांच्या जयंती दिनी पूर्ण होत आहे या गोष्टीचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये सदस्यता नोंदणी अभियान सुरु असून महाराष्ट्रात ५ जानेवारी पासून एकाच वेळी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे अभियान सुरु होणार आहे. यासाठी नमो एॅप व ८८००००२०२४ या क्रमांकावर कॉल करणे आवश्यक असून याद्वारे आलेल्या लिंक मध्ये नवीन सदस्याची माहिती भरावयाची आहे. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाची स्वतंत्र सदस्य नोंदणी करायची असून प्रत्येक बूथवर २०० सदस्य होणे अपेक्षित आहे. आघाडी, मोर्चा यांच्या संयुक्त अभियानाच्या माध्यमातून बूथ स्तरावरील समाज घटकांना भाजपाशी जोडण्याचा उद्देश आहे.  आपल्या बूथची वर्गवारी करून बूथ मधील ७५% लोकांची सदस्य नोंदणी होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य अशा सर्वांना किमान २००० सदस्य नोंदणी आवश्यक आहे. या माध्यमातून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते पुन्हा एकदा बूथ रचनेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात जावून त्यांची मते आजमावून घेणार आहेत.  या मोहिमेचा जास्तीत-जास्त लोकांना भाजपा सदस्य बनवण्याचा व्यापक उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

     याप्रसंगी अशोक देसाई, गायत्री राउत, डॉ राजवर्धन, अप्पा लाड, राजू मोरे, शैलेश पाटील, उमा इंगळे, माधुती नकाते, धनश्री तोडकर, विजयसिंह खाडे-पाटील, भरत काळे, दिग्विजय कालेकर, अमर साठे, मंगला निपाणीकर, संगीता खाडे, सुधीर देसाई, सचिन कुलकर्णी, अभिजित शिंदे, प्रकाश सरनाईक, विशाल शिराळकर, सतीश घरपणकर, गिरीश साळोखे, अनिल कामात,  आजम जमादार, संतोष माळी, संदीप कुंभार, सयाजी आळवेकर, किरण नकाते, दिलीप मेत्राणी, अमोल पालोजी, रीमा पालनकर, अश्विनी गोपुगडे, तेजस्विनी पार्टे, अॅड तांबे, पद्मिनी गुहागरकर, प्रणोती पाटील, अश्विनी वास्कर, रविकिरण गवळी, धीरज पाटील, अशोक लोहार, योगेश कांगटानी, अवधूत भाट्ये, अमेय भालकर, सुनील पाटील, विश्वास जाधव, दिलीप बोंद्रे, मामा कोळवणकर, जयराज निंबाळकर, प्रकाश घाटगे, अरविंद वडगांवकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.