कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक साहेब माध्यमातून आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकाराने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (पोलीस लाईन) अंतर्गत आयकॉन प्रेसिडेन्सी ते माईसाहेब बावडेकर शाळा या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी २५ कोटी निधीपैकी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला.
तसेच, प्रभाग क्रमांक २ (कसबा बावडा) अंतर्गत बिरंजे पानंद शाहू सर्कल ५ ते ९ चॅनेल गटर करणे तसेच कोळी घर, तोरस्कर घर ते बाबुराव चव्हाण व संजय शिंदे ते धोत्री राजू विरेकर (पश्चिम बाजू) गटर उभारण्यासाठी २० लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
या महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी स्थानिकांच्या मागण्यांची पूर्तता करताना त्यांच्या मूलभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आहे. या कामांमुळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींना दिलासा मिळणार आहे.
यावेळी किरण शिराळे जी, चंद्रकांत घाडगे जी, प्रदीप उलपे जी, सचिन पवार जी, धीरज उलपे जी, किसन खोत जी, अमर साठे जी, प्रदीप मगदूम जी, रावसाहेब चौगुले जी, किशोर पवार जी, संतोष जाधव जी, बाबा चव्हाण जी, रावसाहेब चौगुले जी आदी मान्यवर उपस्थित होते.