आ. हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री पदी नियुक्त

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी पुन्हा नियुक्त होऊन राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पद व गोपनीयतेची शपथ घेतली.

 

मुश्रीफ यांनी राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून राज्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब यांसह महायुतीतील सर्वच पक्षश्रेष्ठींचे व मान्यवर नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

तसेच इथपर्यंतचा प्रवास करण्यात माझ्या पाठीशी भक्कम आशीर्वाद उभे करणाऱ्या माझ्या कागल गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील माय-बाप जनतेचे व सहकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.