दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.12)भेट घेतली. ही बैठक संसद भवनातील अमित शहा यांच्या कार्यालयात झाली. १४ डिसेंबर रोजी नवीन मंत्रिमंडळ सदस्याचा शपथविधी कार्यक्रम आहे. त्यामुळे अजित पवारांनी अमित शहांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा अर्थ खात्यासह जुनी खाती मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबर रोजी होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात एकूण 288 जागा असून सरकारमध्ये एकूण 43 मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. भाजपने 20 मंत्रिपदे ठेवण्याची तयारी केली असून, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 12 तर अजित पवार यांच्या पक्षाला 10 मंत्रिपद मिळेल असे मानले जाते.