फुलेवाडी येथे काँग्रेस तसेच आघाडीच्या इतर पक्षाचा चिंतन मेळावा

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस तसेच आघाडीच्या इतर पक्षाचा चिंतन मेळावा बुधवार(दि ११) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अमृत हॉल फुलेवाडी येथे संपन्न झाला.

 

 

यावेळी राहुल पाटील म्हणाले, या निवडणुकीत जरी पराभव पत्करावा लागला असला तरी निवडणूक अटीतटीची झाली. हजारो करवीरवासीयांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मतदान केलं त्यांचा मी सदैव ऋणी राहील. तसेच आगामी काळात या करवीरच्या जनतेसाठी आमदार पी एन पाटील साहेब यांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा निर्धार अटळ राहील. असे मत यावेळी व्यक्त केले.

या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडून आगामी काळात कशा पद्धतीने वाटचाल करायची यावर चर्चा केली.

यावेळी आमदार पी एन पाटील यांना मानणारे सर्व कार्यकर्ते नागरिक तसेच महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते आदी उपस्थित होते.