कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी आणि संचालकांनी आमदार अमल महाडिक यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. कोल्हापूर विमानतळावरून सुरू झालेल्या विमानसेवेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय बहरला आहे तथापि अनेकदा ऐनवेळी केलेल्या फ्लाईट कॅन्सलेशनमुळे टूर ऑपरेटर्सना नुकसान सोसावे लागते. यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याची विनंती यावेळी टूर ऑपरेटर्सनी केली.
या संदर्भात लवकरच तोडगा काढला जाईल असा विश्वास अमल महाडिक यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर कोल्हापुरातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या आणि काही नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. कोल्हापुरातील पर्यटन व्यवसायवाढीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले. यावेळी टूर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुरज नाईक, उपाध्यक्ष शरद चौगुले, सचिव रोहन नायर, कोषाध्यक्ष स्वरूप ताम्हणकर, मोहसीन मुजावर, विश्वजीत सडोलीकर, वैभव कुलकर्णी यांच्यासह टूर ऑपरेटर उपस्थित होते.